logo

Veer Seva Dal Korochi

स्थापना : १२ जानेवारी १९८३

श्री. १०८ जयभद्रजी पाठशाळा

कोरोची मधील जैन समाजातील मुलांवर धार्मिक संस्कार व्हावेत यासाठी पाठशाळा सुरु करण्यात आली. श्री. १०८ आचार्य जयभद्रजी महाराज यांच्या आशिर्वादाने ही पाठशाळा सुरु झाली. या पाठशाळेची स्थापना जून १९८९ मध्ये झाली. या पाठशाळेचे शिक्षक म्हणून आदिनाथ मगदूम लाभलेले आहेत. मगदूम सरांनी अल्पावधीतच या पाठशाळेला वैभव प्राप्त करून दिले. या पाठशाळेला वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचा आदर्श पाठशाळा पुरस्कार ही मिळाला आहे. या पाठशाळे बरोबर कोरोचीत निशिदीकावर रत्नत्रय पाठशाळा या नावाने आणखी एक पाठशाळा सुरु झाली आहे. जयभद्रजी पाठशाळेत आता वैशाली उपाध्ये, स्मिता बापूसो पाटील, स्मिता बाळगोंडा पाटील या शिक्षिका म्हणून काम पाहत आहेत.

Event Event

सन्मान व पुरस्कार

वीर सेवा दल मध्यवर्ती समितीकडून जयभद्रजी पाठशाळेला 'आदर्श पाठशाळा' पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच पाठशाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात सलग दोन वर्ष (२०१५-१६ व २०१६-१७) प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हे स्नेहसंमेलन कोरोची व बोलवाड या ठिकाणी झालेले होते. वीर सेवा दल मध्यवर्ती समितीकडून घेण्यात येत असलेल्या २०१६ सालच्या प्रथमा परीक्षेत संपूर्ण केंद्रात कोरोचीच्या जयभद्रजी पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय हे तिन्ही क्रमांक पटकाविले आहेत.

Event Event