logo

Veer Seva Dal Korochi

स्थापना : १२ जानेवारी १९८३

Current year (2017)

ओढा स्वच्छतेसाठी वीर सेवा दल कोरोचीचा पुढाकार

वीर सेवा दल शाखा कोरोची, वीर सेवा दल जिल्हा व तालुका समिती कोल्हापूर, सकाळ समूह व स्वामिनी तनिष्क गट यांच्यातर्फे रविवार दि. ७ मे रोजी कोरोची गावभाग येथील ओढ्याची स्वच्छता व रुंदीकरण करण्यात येणार आहे. जल संवर्धन अभियानांतर्गत 'पाणी अडवा पाणी जिरवा' हा उपक्रम यातून राबविण्यात येणार आहे.

कोरोची येथे गावालगतच लक्ष्मी इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढा आहे. हा ओढा आळते भागातून येतो. या ओढ्यात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. याबरोबरच ओढा रुंदीकरण ही गरजेचे बनले आहे. या रुंदीकरणाचा फायदा परिसरातील कुपनलिका व विहिरींना होणार आहे. रुंदीकरणामुळे पाणी अडवण्याची क्षमताही वाढणार असून सर्व शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. यामुळेच वीर सेवा दल कोरोची शाखेने पुढाकार घेऊन हा उपक्रम चालू केला आहे


या उपक्रमासाठी कोरोची शाखे बरोबरच वीर सेवा दल जिल्हा व तालुका समिती कोल्हापूर, स्वामिनी तनिष्क गट, गावभागातील विविध मंडळातील सदस्य, वीर सेवा दलाचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवीला जाणार आहे. यासाठी नुकतीच वीर सेवा दलाची बैठक सुपर पडली. या बैठकीत कामाचे नियोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी वीर सेवा दलाच्या सर्व सदस्यांनी तसेच गावातील विविध मंडळातील मुलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाप्रमुख अजित पाटील, जिल्हासचिव विजय बरगाले, संघनायक स्वप्निल उपाध्ये. उपसंघनायक सौरभ पाटील.

Event Event

वेबसाईट शुभारंभ

सन २०१७ साली वेबसाईटची निर्मिती करून इतर शाखांना कोरोची शाखेने एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे. अक्षय तृतीयाच्या सोनेरी मुर्हुतावर शुक्रवार दि. २८ एप्रिल २०१७ रोजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी कोरोची शाखेचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन केले.

वीर सेवा दल मध्यवर्ती समिती अंतर्गत असलेल्या २०० शाखांमधून वेबसाईटची निर्मिती करणारी शाखा कोरोची हि 'पहिली व एकमेव' शाखा ठरली आहे.

Event

भगवान महावीर जयंती कार्यक्रम

भगवान महावीर जयंती निमित्त सकाळी उदगाव येथून अहिंसा ज्योत आणण्यात आली. यानंतर महिलांसाठी व मुलांसाठी २८ गटांतर्गत विविध स्पर्धा नॅशनल स्पोर्टस व वीर सेवा दल शाखा कोरोची यांचे वतीने घेण्यात आल्या. महिलांसाठी संगीत खुर्ची, बादलीत बॉल टाकणे. स्पंजने पाणी भरणे, डोळे बांधून मंदिरातील घंटा वाजविणे तसेच मुलांसाठी धावणे, दोन चाकी सायकल, तीन चाकी सायकल, लिंबू चमचा, दोरी उड्या आदी स्पर्धा संपन्न झाल्या.

संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर जयभद्रजी पाठशाळा यांचा देशभक्तिपर गीतावर डान्स शो, महिलांसाठी फनी गेम्स व स्पॉट गेम्सचा कार्यक्रमही उत्साहात झाला.

Event Event

मोफत आरोग्य तपासणी शिबिर

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वीर सेवा दल शाखा कोरोची आणि सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरज, प्रगती हॉस्पिटल मिरज आणि लाईफगेन थेरपी, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन २६ जानेवारी २०१७ रोजी करण्यात आले. या शिबिरात तोंडासंबंधी कॅन्सर, कान-नाक-घसा, दंतरोग व लाईफगेन मेडिकल थेरपी आदी तपासणी करण्यात आले. १८४ शिबिरार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला. कॅन्सर रुग्णांची तपासणी डॉ. व्ही. एम. कुलकर्णी, कान-नाक-घसा डॉ. राहुल विसापुरे, दंतरोग पृथ्वीराज पाटील. लाईफगेन थेरपी अरुण केटकाळे यांनी केले. शिबिराचे उदघाटन सरपंच सुहास पाटील, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, माजी सरपंच मनोहर खारकांडे, सर्जेराव माने, मंदिर कमिटी अध्यक्ष तात्यासो पाटील, अशोक पाटील, धनंजय पाटील, शितल पाटील, शितल चौगुले, चंद्रकांत चौगुले यांच्या उपस्थितीत झाले. प्रारंभी मंदिरातील ध्वजारोहण संजय तातोबा रुग्गे व आदगोंडा सिदगोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Event Event