logo

Veer Seva Dal Korochi

स्थापना : १२ जानेवारी १९८३

Events & Activities

Event Event

जैन समाजात धार्मिक आणि सामाजिक जागृती निर्माण व्हावी या हेतूने व्याख्यानमाला सुरू करण्यात आलेली आहे. ही व्याख्यानमाला अँड. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावाने सुरु करण्यात आलेली आहे . यामध्ये ज्ञानी आणि विद्वानांकडून प्रबोधन केले जाते. ही व्याख्यानमाला २२ वर्ष सुरु असून यामध्ये सुमारे ३०० व्याख्यात्यांची व्याख्याने झालेली आहेत. बाबासाहेब पुरंदरे, शिवाजीराव भोसले, निर्मलकुमार फडकुले, अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील, यु. मो. पठाण, बा. ब्र. संजय गोपालकर, डॉ. विजय आवटी, डॉ. अजित पाटील, अँड. अपर्णा रामतीर्थकर आदी मोठ-मोठे वक्ते व्याख्यानमालेसाठी लाभलेले आहेत.

Image Preview

वीर सेवा दल शाखा कोरोचीचा सर्वात आदर्श उपक्रम म्हणजे पांजरपोळ अभियान होय. या अभियानांतर्गत जी जनावरे कत्तलखान्याकडे नेली जातात अशा जनावरांना शाखेतर्फे पांजरपोळला सोडले जाते. २०१२ पासून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. कोरोची गावातील सर्व शेतकरी वर्गाकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत १६ जाणारे पांजरपोळला सोडण्यात आलेली आहेत. अशाप्रकारे मुक्या जनावरांना जीवनदान देण्याचे कार्य शाखेतर्फे घडत आहे.

Event Event

समाजातील युवतींना सक्षम बनवण्यासाठी युवती सक्षमीकरण शिबीर घेण्यात आले. या शिबिराला युवतींकडून उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला. ६२ युवतींनी या शिबिराचा लाभ घेतला. या माध्यमातून युवतींमध्ये एक नवा आत्मविश्वास, नवा ऊत्साह निर्माण झाला. युवती सक्षमीकरणाद्वारे युवतींना योग्य दिशा देण्याचे कार्य शाखेने केले.

Image Preview

वीर सेवा दल मध्यवर्ती समिती अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व पाठशाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम शाखेमार्फत घेण्यात आला. या स्नेहसंमेलनाला सर्व पाठशाळांचा रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाला. धावणे, रांगोळी, रंगभरण, धर्म को जानो, श्लोक पाठांतर व सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वच विभागात स्पर्धकांकडून सर्वोत्तम प्रतिसाद मिळाला. नेटके व सुंदर नियोजनामुळे शाखेने हा स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी केला.

Event Event

शाखेमार्फत आतापर्यंत नेत्र तपासणी, रक्तदान, रक्तगट, कान-नाक-घसा, कॅन्सर, दात तपासणी अशी निरनिराळी शिबिरे वेळोवेळी घेण्यात आलेली आहेत. या शिबिरांना नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. याबरोबर भगवान महावीर जयंती रोजी मुलांसाठी व महिलांसाठी विविध स्पर्धा कार्यक्रम, मॅरेथॉन स्पर्धा या नॅशनल स्पोर्टसच्या माध्यमातून घेतल्या जातात.

Image Preview

समाजातील मुलांचा कल पाठशाळेकडे वाढावा, मुलांना धर्माचे महत्व कळावे याकरीता शाखेतर्फे 'जीवनाची पहिली शाळा आमची पाठशाळा' हि नाटिका तयार करण्यात आली. यामध्ये जयभद्रजी पाठशाळा कोरोची पाठशाळेतील मुलांनी सहभाग घेतला. ही नाटिका प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त बेल्लद बागेवाडी येथे सादर करण्यात आली . या नाटिकेला सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळाला

Image Preview

कोरोचीतील मंदिरात शाखेतर्फे मुनी गुंफाची निर्मिती करण्यात आली. शाखेने गावातील देणगीदार व सर्व श्रावक श्रविकांच्या मदतीने सुंदर अशी मुनी गुंफा बांधली. 'शांतिसागर त्यागी निवास' 'वीराश्रम' असे नाव या गुंफेला देण्यात आले. २२ ऑगस्ट १९९६ साली ही गुंफा बांधण्यात आली.

Image Preview

लायन्स क्लब ऑफ सांगली यांच्याकडून २०१२ साली झालेल्या नेत्र तपासणी शिबिरातील उत्कृष्ट नियोजन आणि सहकार्याबद्दल वीर सेवा दल शाखा कोरोचीला 'सर्वोत्कृष्ट आदर्श शाखा' पुरस्कार मिळाला. पुरस्कार बाहुबली येथे संघनायक व उपसंघनायक शिबिरामध्ये वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष संजय गोपालकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारासाठी एकूण ३० वीर सेवा दल शाखा आणि ३२ विविध मंडळे यामधून कोरोची शाखेची निवड करण्यात आली.