logo

Veer Seva Dal Korochi

स्थापना : १२ जानेवारी १९८३

About Veer Seva Dal, Korochi

वीर सेवा दल म्हणजे काय?

जो आपल्या शक्तीचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी करतो तो खरा "वीर", समाजाचे निरपेक्ष वृत्तीने केलेले कार्य म्हणजे "सेवा" आणि सुसंघटित व सुशासित संघटन म्हणजे "दल".

वीर सेवा दल ही दक्षिण भारत जैन सभेची एक बळकट शाखा आहे. युवकांच्या सर्वांगीन विकासासाठी अहोरात्र झटणारी एक सेवाभावी संघटना आहे. युवकांना विधायक विचारांची प्रेरणा देणारी, भरकटणाऱ्या युवकांना सदाचार शिकवणारी आणि पाठशाळेच्या माध्यमातून बाल मनावर धर्म संस्कार करणारी संघटना होय. समाज प्रबोधना बरोबरच समाजसेवेचे उचित आनंद प्राप्त करून देणारे साधन म्हणजे वीर सेवा दल होय.

वीर सेवा दलाच्या माध्यमातून विविध संस्था चालविल्या जातात तसेच संघटनेच्या माध्यमातून वक्ते समाजाला संबोधित करत असतात. संपूर्ण देशातील पूजा महोत्सवात वीर सेवा दलाचे स्वयंसेवक आपली सेवा आत्मियतेने देतात. वृक्षारोपण, व्यसनमुक्ती या क्षेत्रामध्ये वीर सेवा दलाने आपले श्रेष्ठतम असे स्थान निर्माण केले आहे.

वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे

कुचनुरे सरांना समंतभद्र महाराज यांचे शुभाशिर्वाद व प्रेरणा मिळाली. सर्वात मोठी व पहिली व्यसनमुक्ती रॅली बाबासाहेब कुचनुरे सरांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. बाबासाहेब कुचनुरे सर युवकांचे आदर्श व स्फूर्तिस्थान होते. फारच कमी कालावधीत त्यांनी सेवा दलाला उच्चतम पातळीवर नेले. सरांना 'वीराचार्य' 'वीरशिरोमणी' या पदव्यांनी गौरविण्यात आलेले आहे.

History

दक्षिण भारत जैन सभेच्या दावणगिरी येथील अधिवेशनात वीर सेवा दल मध्यवर्ती समितीची स्थापना झाली. या पाठोपाठच गावा-गावात वीर सेवा दलाच्या शाखा सुरु होऊ लागल्या. शाखा स्थापनेसाठी अँड. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सरांनी पुढाकार घेतला. कोरोची गावातही कुचनुरे सर येत होते. सर्व युवकांना स्वतः घरातून बोलावून आणत होते, वीर सेवा दलाचे महत्त्व सर्वांना समजावून सांगत होते. १९८० सालापासूनच कोरोचीत वीर सेवा दलाचे कार्य सुरु झालेले होते. कुचनुरे सरांच्या उपस्थितीत १२ जानेवारी १९८३ रोजी वीर सेवा दल शाखा - कोरोचीची स्थापना झाली आणि एक नव्या अध्यायाला सुरुवात झाली. पहिल्या संघनायक पदाचा मान श्री. देवगोंडा सुरगोंडा पाटील यांना मिळाला. वीर सेवा दल कोरोची शाखेने फारच अल्प कालावधीत समाजाभिमुख कार्याला सुरुवात केली तसेच कुचनुरे सरांच्या मर्जीतील शाखा म्हणून नाव लौकिक मिळवला. कुचनुरे सरांचे कोरोची शाखेतील सदस्यांबरोबर घनिष्ठ संबंध होते. कोणत्याही कार्यक्रमाला सरांकडून कोरोची शाखेतील सदस्यांची विचारणा होत होती. सरांच्या मार्गदर्शनाने शाखेने केलेली कामगिरी प्रथम दशकातील

 •  आदिनाथ भगवंताचा निर्वाण महोत्सव साजरा.
 •   जैन मंदिराचे पूर्ण रंगकाम व स्वच्छता.
 •   निशिदीकावरील चरण पादुकांवर कळस स्थापना.
 •   मंदिरात ध्वजारोहणाची परंपरा.
 •   बाहुबली येथे तीर्थ संरक्षणासाठी सेवा योगदान.
 •  दुधगंगा नदी पूर प्रसंगी पूरग्रस्तांना आर्थिक व धान्याची मदत.
 •   बाहुबली ब्रम्हचर्याश्रमासाठी २४ पोती धान्य.
 •   अकिवाट गावातील श्रमदान शिबिरात सक्रिय सहभाग.
 •  जयसिंगपूर ते नांद्रे व्यसनमुक्ती दिंडीत सहभाग.
 •  कोल्हापूर व्यसनमुक्ती दिंडीत सहभाग.
 •  ठिक ठिकाणच्या पूजेसाठी सेवा योगदान.
 •   जैन मंदिरात वृक्षारोपण.

वीर सेवा दलाच्या या प्रथम दशकाच्या कालावधीत देवगोंडा सुरगोंडा पाटील, राजगोंडा बाळगोंडा पाटील, शरद मलगोंडा पाटील, महावीर कलगोंडा पाटील, आण्णासो जिनगोंडा पाटील (हेर्लेकर), चंद्रकांत बाळासो चावरे, देवगोंडा भुजगोंडा पाटील, रविंद्र बाळगोंडा पाटील, रायगोंडा आदगोंडा पाटील, नेमगोंडा सिदगोंडा पाटील. बाळासो नरसू नागावे, बाबुराव देवाप्पा नागावे, सुकुमार आप्पासो चौगुले, बाबासाहेब आडमुठे, महावीर आप्पा पाटील, अजित अक्कोळे, मलगोंडा आण्णा पाटील, चवगोंडा चावरे, सुरेश कुबेर चावरे आदी सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

या दशकात कोरोची शाखेने सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेटाने नेला. वीर सेवा दलाकडे युवकांचा ओघ वाढला. सेवा दलाचे सर्व कार्य पेपरवर येण्यास सुरवात झाली. फाईल, फोटो जमा - खर्च ठेवण्यात येऊ लागले. या दशकात समाज जागृती वाढावी म्हणून व्याख्यानमाला सुरु करण्यात आली आणि आजही ही परंपरा मोठया दिमाखात सुरु आहे. याबरोबर जैन मंदिरात गुंफा निर्मितीचे सर्वात मोठे कार्य केले तसेच श्रवणबेळगोळ तीर्थ संरक्षणासाठी शाखेतील ६५ स्वयसेवकांनी सतत १ १/४ वर्ष सेवा योगदानाची धुरा सांभाळली. निरनिराळ्या ठिकाणच्या पूजेत सेवा योगदान, मुनी सेवा, व्याख्यानमालेचे सुंदर नियोजन अशी कार्ये या दशकात झाली.

वीर सेवा दलाच्या दुसऱ्या दशकाच्या कालावधीत कुमार आण्णासो कोथळे, अशोक जिनगोंडा पाटील, राजेंद्र सुरगोंडा पाटील, धनंजय मलगोंडा पाटील, जितेंद्र रावसो नाईक, सागर नरसगोंडा पाटील, अँड. अनिल तात्यासो पाटील, अजित बाबासो मांणगावे, सुरेश आदगोंडा पाटील, उदय दादा पाटील, अभय रावसो नाईक, प्रकाश आप्पासो पाटील, शामगोंड पाटील, शरद मलगोंडा पाटील, महावीर आप्पासो पाटील, रोहित बापुसो पाटील, सचिन बाळगोंडा पाटील, अमोल दादा चौगुले, प्रवीण वसंतराव शेटे, सचिन बाळगोंडा पाटील, अशोक धनपाल काणे, चंद्रकांत आप्पासो पाटील, महावीर चौगुले, महावीर तातोबा पाटील, विजय आप्पासो पाटील आदी सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

वीर सेवा दलाच्या या कालावधीत शाखेने उत्तुंग अशी कामगिरी केली. तिसऱ्या दशकाच्या कालावधीत निरनिराळे उपक्रम, विविध कार्यक्रमे, प्रत्येक कार्याचे उत्कृष्ट संकलन, शाखेच्या कार्यात वेळोवेळी सुधारणा यातून कोरोची शाखेला एका नव्या उंचीवर नेण्याचे कार्य या काळात घडले. येणाऱ्या पिढीला, युवकांना एक नवीन बेंच मार्क शाखेने घालून दिला. या कालावधीत शाखेने केलेली कामगिरी

 •  व्याख्यानमालेचे उत्कृष्ट नियोजन.
 •  जनावरांसाठी पांजरपोळ अभियान.
 •   विविध नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरे.
 •  प्रॉफिट-लॉस अकौंट, बॅलनशीटद्वारे जमा-खर्च.
 •  युवती सक्षमीकरण शिबिर.
 •  वृत्तपत्रातील बातम्यांचे उत्कृष्ट संकलन.
 •  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पाठशाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन.
 •  भ. महावीर जयंती निमित्त विविध कार्यक्रम.
 •  वृक्षारोपण, रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिरे.
 •  निरनिराळ्या शिबिर व पूजेत सेवा योगदान.