logo

Veer Seva Dal Korochi

स्थापना : १२ जानेवारी १९८३

banner4 banner4 banner4
Veersevadal अहिंसा परमो धर्म Veersevadal जैनम जयतु शासनम Veersevadalव्यसनमुक्ती हीच राष्ट्रशक्ती Veersevadal मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी Veersevadal उत्तम आहार, शाकाहार Veersevadal पशु सेवा हिच ईश्वर सेवा होय Veersevadal संपत्ती वाऱ्यावर उडून जाते. टिकून राहते ती गोष्ट एकच चारित्र्य. Veersevadal जगा व जगू द्या.

Veer Seva Dal, Korochi

वीर सेवा दल ही दक्षिण भारत जैन सभेची एक बळकट शाखा आहे. युवकांच्या सर्वांगीन विकासासाठी अहोरात्र झटणारी एक सेवाभावी संघटना आहे. युवकांना विधायक विचारांची प्रेरणा देणारी, भरकटणाऱ्या युवकांना सदाचार शिकवणारी, पाठशाळेच्या माध्यमातून बाल मनावर धर्म संस्कार करणारी संघटना म्हणजे वीर सेवा दल होय. समाज प्रबोधना बरोबरच समाजसेवेचे उचित आनंद प्राप्त करून देणारे साधन म्हणजे वीर सेवा दल होय.

वीर सेवा दलाच्या माध्यमातून विविध संस्था चालविल्या जातात तसेच संघटनेच्या माध्यमातून वक्ते समाजाला संबोधित करत असतात. संपूर्ण देशातील पूजा महोत्सवात वीर सेवा दलाचे स्वयंसेवक आपली सेवा आत्मियतेने देतात. वृक्षारोपण, व्यसनमुक्ती या क्षेत्रामध्ये वीर सेवा दलाने आपले श्रेष्ठतम असे स्थान निर्माण केले आहे .

कोरोची शाखेचा शुभारंभ

दक्षिण भारत जैन सभेच्या दावणगिरी येथील अधिवेशनात वीर सेवा दल मध्यवर्ती समितीची स्थापना झाली. या पाठोपाठच गावा-गावात वीर सेवा दलाच्या शाखा सुरु होऊ लागल्या. शाखा स्थापनेसाठी अँड. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सरांनी पुढाकार घेतला.


Veersevadal

प्रथमाचार्य श्री १०८ शांतिसागरजी महाराज (चातुर्मास 1942)

Veersevadal

आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज

Advertisement


banner1 banner2 banner3

Veerachary Babasaheb Kuchnure
Veersevadal

वीर सेवा दलाला वैभव प्राप्त करून देणारे, एक नव्या उंचीवर नेणारे, आपले संपूर्ण जीवन वीर सेवा दलाला समर्पित करणारे नेतृत्व म्हणजे बाबासाहेब कुचनुरे होय. वकिलकीच्या सरावा सोबत जैन समाजाच्या विकासाचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते सत्यात उतरविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समाजाला समर्पित केले. समाजातील युवक वर्ग म्हणजे सर्वात मोठी ताकद आहे. त्यांनी युवकांना संघटित करून वीर सेवा दलाच्या प्रवाहात आणले. गावोगावी त्यांनी युवकांना एकत्रित करून सेवा दलाच्या शाखा स्थापन केल्या.